हत्येचा आरोप असणाऱ्या राजाभैय्याचा राजीनामा

उत्तर प्रदेशचा बाहुबली नेता आणि अखिलेश सरकारमधील मंत्री रघुराज प्रतापसिंग उर्फ राजाभय्या यानं मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेशच्या अखिलेश सरकारमध्ये तो नागरी पुरवठा मंत्रीपदावर होता.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 4, 2013, 03:39 PM IST

www.24taas.com,लखनौ
उत्तर प्रदेशचा बाहुबली नेता आणि अखिलेश सरकारमधील मंत्री रघुराज प्रतापसिंग उर्फ राजाभय्या यानं मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेशच्या अखिलेश सरकारमध्ये तो नागरी पुरवठा मंत्रीपदावर होता.
राजा भय्यावर प्रतापगढ जिल्ह्याच्या डीएसपीच्या हत्येचा आरोप आहे. डीएसपी झिया उल हक यांची जमावाकडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा सूत्रधार राजाभय्या असल्याचा आरोप पोलीस अधिका-याच्या नातेवाईकांनी केलाय. राजाभय्या यानं आज त्याचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडं सोपवला. राजीनामा राज्यपालांनी स्वीकारल्याचं समाजवादी पार्टीच्या सुत्रांनी सांगितलं.

दरम्यान उत्तर प्रदेशचं सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी बसपा नेत्या मायावती यांनी केली आहे.