एक गाढव १० रुपयात सांगतो भविष्य, दररोज होतात ७ शो

डिजिटल इंडियाच्या या युगात एक गाढव भविष्य सांगण्याचं काम करतोय. राजस्थानच्या वाडमेरमध्ये अंधविश्वासाची अशी 'लीला' आपण पाहिली नसेल. गंगाराम नावाच्या या गाढवाला पाहण्यासाठी आणि भविष्य विचारण्यासाठी लोकांची चांगलीच गर्दी होतेय.

Updated: Jul 9, 2015, 08:04 PM IST
एक गाढव १० रुपयात सांगतो भविष्य, दररोज होतात ७ शो title=

बाडमेर, राजस्थान: डिजिटल इंडियाच्या या युगात एक गाढव भविष्य सांगण्याचं काम करतोय. राजस्थानच्या वाडमेरमध्ये अंधविश्वासाची अशी 'लीला' आपण पाहिली नसेल. गंगाराम नावाच्या या गाढवाला पाहण्यासाठी आणि भविष्य विचारण्यासाठी लोकांची चांगलीच गर्दी होतेय.

रोज शेकडो जण ऐकतात भविष्य

आश्चर्याची बाब म्हणजे की, गाढवाकडून आपलं भविष्य ऐकूण घेण्यासाठी शेकडो लोकं उत्सुक दिसतात. परिसरात गंगाराम नावाच्या या गाढवाचा शो आजोजित केला जातो. भविष्य सांगण्यासाठी त्याचे दररोज ७ शो होतात. या शोची एंट्री फी १० रुपये आहे. 

गाढव देतो बरोबर उत्तर

लोकांची अशी मान्यता आहे की गंगाराम गाढव इथं आलेल्या लोकांच्या प्रश्नांना अगदी अचूक उत्तरं देतो. गाढवाचा मालक लोकांना प्रश्न विचारून गंगारामला उत्तर विचारतो. विशेष म्हणजे भविष्य ऐकून ते विचारणारे लोकंही तृप्त दिसतात. 

दैवी कृपेचा परिणाम

गंगाराम गाढवाचा मालक मोहम्मद याला ट्रेनिंग आणि दैवी कृपेचा प्रसाद मानतो. मात्र याला अंधश्रद्धा नाही तर दुसरं काय म्हणावं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.