भारतीय रेल्वेकडून गुड न्यूज...पाण्याची बाटली ५ रुपयांत

रेल्वेने प्रवास करण्यासाठी भारतीय रेल्वेने गुड न्यूज आणली आहे. आता रेल्वेत रेल नीर कमी पैशात उपलब्ध करुन देणार आहे. एक लीटरसाठी ५ रुपये, अर्धा लीटरसाठी ३ रुपये तसेच पाऊचसाठी १ किंवा २ रुपये द्यावे लागतील.

Updated: Jul 9, 2015, 06:15 PM IST
भारतीय रेल्वेकडून गुड न्यूज...पाण्याची बाटली ५ रुपयांत title=

नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करण्यासाठी भारतीय रेल्वेने गुड न्यूज आणली आहे. आता रेल्वेत रेल नीर कमी पैशात उपलब्ध करुन देणार आहे. एक लीटरसाठी ५ रुपये, अर्धा लीटरसाठी ३ रुपये तसेच पाऊचसाठी १ किंवा २ रुपये द्यावे लागतील.

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना कमी किमतीत पाणी मिळणार आहे. याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) देशात १२०० रेल्वे स्थानकांवर ५,००० वॉटर वेंडींग मशिन बसवणार आहे. तशी योजना आखण्यात येत आहे.

रेल्वेने यासाठी देशातील वॉटर वेंडींगसंबंधीत कंपन्यांची निवड केली आहे. मसलन आयोन एक्सचेंज, यूरेका फोर्ब्स आणि केंट आरओ या कंपन्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. याबरोबर रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांना कमी दरात चांगले पाणी मिळेल. रेल्वेने या योजनेसाठी २१ जणांचे पॅनेल तयार केले आहे. रेल्वे स्टेशन प्लेटफॉर्मवर २-२ वॉटर वेंडींग मशिन लावली जाणार आहेत. या मशिनमधून १ ते ५ रुपये दरात पाणी उपलब्ध होईल.

ही योजना यशस्वी झाली की, १ लीटर पाण्याची बाटली ५ रुपयांना तर अर्धा लीटरची बाटली ३ रुपयांना देण्याची योजना आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.