बिहारमध्ये राजधानी एक्स्प्रेसचे डबे घसरले, 4 ठार

राजधानी एक्स्प्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले आहेत, ही एक्सप्रेस दिल्लीहून दिब्रूगढला जात होती. बिहारच्या छापरामध्ये हा अपघात झाला. या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर आठ जण जखमी आहेत.

Updated: Jun 25, 2014, 08:46 AM IST
बिहारमध्ये राजधानी एक्स्प्रेसचे डबे घसरले, 4 ठार title=

पाटणा : राजधानी एक्स्प्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले आहेत, ही एक्सप्रेस दिल्लीहून दिब्रूगढला जात होती. बिहारच्या छापरामध्ये हा अपघात झाला. या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर आठ जण जखमी आहेत.

 हा अपघात मंगळवारी रात्री 2 वाजता झाला. दरम्यान प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
 
अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना 2 लाख, जखमींना 1 लाख आणि किरकोळ जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अपघातासंदर्भात मदत आणि बचावकार्यासाठी हेल्पलाईन नंबर देण्यात आले आहे. 

या हल्ल्यामागे माओवाद्यांचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, कारण गाडीला अचानक रोखण्यात आलं होतं. तसंच पुढचे रुळ उडवण्यात आले होते. तरी, या अपघातामध्ये घातपाताची शक्यता असू शकते, असं रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी वर्तवली आहे. 

अपघातासंदर्भात मदत आणि बचावकार्यासाठी हेल्पलाईन नंबर 9771443941, 03732300131, 06152243409 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.