अक्षय कुमारचे शहिद जवानांच्या कुटुंबासाठी 'वीर' पोर्टल

शहीदांच्या परिवारांना आर्थिक मदत देण्यासाठी आजपासून एक ऑनलाईन व्यासपीठ लाँच करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते 'वीर' नावाचं एक नवं पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. यावेळी अभिनेता अक्षय कुमार सुद्धा उपस्थित राहणार आहे.  

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 9, 2017, 12:57 PM IST
अक्षय कुमारचे शहिद जवानांच्या कुटुंबासाठी 'वीर' पोर्टल title=

नवी दिल्ली : शहीदांच्या परिवारांना आर्थिक मदत देण्यासाठी आजपासून एक ऑनलाईन व्यासपीठ लाँच करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते 'वीर' नावाचं एक नवं पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. यावेळी अभिनेता अक्षय कुमार सुद्धा उपस्थित राहणार आहे.  

आज दिल्लीतल्या विज्ञान भवनात ही वेबसाईट लॉन्च करण्यात येणार आहे. वेबसाईटच्या माधम्यातून सामान्य जनतेला शहीदांच्या कुटुंबियांना थेट आर्थिक मदत पाठवता येईल.  

भारत के वीर या नावाचं एक मोबाईल अॅपसुद्धा यावेळी लॉन्च करण्यात येणार आहे. या अॅप किंवा वेबसाईटवरून केलेली आर्थिक मदत ही थेट शहीदांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यात जमा होईल. 

या पोर्टल किंवा अॅपच्या माध्यमातून १५ लाखांची मदत करता येणार आहे. पोर्टलच्या माध्यमातून बीएसएफच्या जवानांशी जनतेचा संपर्कही वाढण्यास त्यामुळे मदत होणार आहे.