लखनऊ : रमजानला 30 जूनपासून सुरुवात होणार आहे. तर येत्या सोमवारपासून मुस्लिमबांधव आपला रोझा सुरु करतील.
30 दिवसांच्या या महिन्यानंतर माह-ए-मुबारकसाठी त्यांनी 1 जुलै तारीख निश्चित केली आहे. 29 जुलै रोजी ईद-उल-फितर हा सण साजरा करण्यात येणार आहे.
शिया समुदायाचे वरिष्ठ धर्मगुरु मौलाना डॉ. कल्बे सादिक यांनी शुक्रवारी माह-ए- रमजान आणि ईदच्यावेळी असणाऱ्या चंद्राची घोषणा केली.
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे उपाध्यक्ष डॉ. कल्बे सादिक यांनी देशांतील लोकांना रमजानच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी ते म्हणालेत, सध्याची परिस्थिती ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाने चंद्राच्या स्थितीची माहिती मिळविणे सहज शक्य आणि सोपे झाले आहे.
मरकजी चांद कमेटीचे अध्यक्ष मौलाना खालिद रशीद फरंगी महली, शिया चांद कमेटीचे अध्यक्ष मौलाना सैफ अब्बास यांनी मुस्लिम समुदयाला आवाहन केलेय शनिवारी चांद पाहा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.