धक्कादायक : एटीएम सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार

कोलकात्यातील हावडा इथल्या एका रहदारीच्या रस्त्यालगत असणाऱ्या एका एटीएम सेंटरमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आलीय. ही महिला मनोरुग्ण असल्याचं समजतंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 14, 2014, 11:22 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता
कोलकात्यातील हावडा इथल्या एका रहदारीच्या रस्त्यालगत असणाऱ्या एका एटीएम सेंटरमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आलीय. ही महिला मनोरुग्ण असल्याचं समजतंय.
काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या एका एटीएम सेंटरमध्ये एका महिलेवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर एटीएम सेंटरची सुरक्षा हा एक चर्चेचा विषय ठरला होता. आता, एटीएम सेंटरमध्येच एका मानसिक रुग्ण असलेल्या महिलेवर बलात्कार झाल्यानं एकच खळबळ उडालीय. विशेष म्हणजे, घटना घडली तेव्हा एटीएम सेंटरच्या बाहेर सुरक्षारक्षकही नव्हता.
पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आलंय. आरोपीचं नाव आर. के. राजेश असं आहे. राजेश विवाहीत असून त्याला दोन मुलंही आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश रात्री उशीरा कामावरून घरी परतत असताना त्याला एटीएम सेंटरच्या ही महिला दिसली. ती मनोरुग्ण असल्याचं लक्षात आल्यावर राजेशनं जबरदस्तीनं तिला एटीएम सेंटरमध्ये नेऊन दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. परंतु, दरवाजा पूर्णपणे बंद होऊ शकला नाही. तरीही त्याने महिलेवर बलात्कार केला.
घाबरलेल्या मनोरुग्ण महिलेनं आरडाओरड केल्यानं समोरच्याच रस्त्यावरून जात असलेल्या एका नागरिकानं हे दृश्यं पाहिलं... त्यावेळी परिसरातील नागरिकांना गोळा करून त्यांनी राजेशला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.