स्टेजवर सगळ्यांसमोर प्रीति झिंट, जया बच्चन यांनी उडवली ऐश्वर्याची खिल्ली? जुना व्हिडीओ Viral

Preity Zinta, Jaya Bachchan and Aishwarya Rai : प्रीति झिंटा आणि जया बच्चन यांनी उडवली ऐश्वर्याची खिल्ली? व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा

दिक्षा पाटील | Updated: May 18, 2024, 02:06 PM IST
स्टेजवर सगळ्यांसमोर प्रीति झिंट, जया बच्चन यांनी उडवली ऐश्वर्याची खिल्ली? जुना व्हिडीओ Viral title=
(Photo Credit : Social Media)

Preity Zinta, Jaya Bachchan and Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही सतत तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्यात आणि बच्चन कुटुंबामुळे सगळं ठीक नसल्याचं म्हटलं जातं. बच्चन कुटुंबाच्या कोणत्या कार्यक्रमात ऐश्वर्या दिसत नाही असे म्हटले जातं होतं. दरम्यान, ऐश्वर्या रायचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला पाहून जया बच्चन आणि प्रीति झिंटावर नेटकरी संतापले आहेत. खरंतर या क्लिपमध्ये ऐश्वर्याच्या शेजारी राहून जया आणि प्रीति हे मस्करी करताना दिसतात. त्यांचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी खडे बोल सुनावले आहे. 

व्हायरल व्हिडीओ हा एका अवॉर्ड फंक्शनमधील आहे. यात जया बच्चन आणि प्रीति झिंटा हे ऐश्वर्याला देवदास या चित्रपटासाठी पुरस्कार देताना दिसतात. एकीकडे ऐश्वर्या ही स्पीच देताना दिसते तर दुसरीकडे प्रीती आणि जया हे गप्पा मारत असल्याचे पाहायला मिळाले. प्रीति झिंटा यावेळी थोडं विचित्र एक्सप्रेशन देताना दिसली. तर जया बच्चन या त्यांच्या हातात असलेल्या कार्डनं स्वत: ला पंखा करताना दिसल्या. त्यांचं एकीकडे बोलणं सुरु असलेलं पाहून असं वाटतंय की ते ऐश्वर्याला डिमोटिव्हेट करत आहेत. या व्हिडीओला पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी जया बच्चनला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. लग्नाच्या आधी ऐश्वर्यासोबत अशी वागत होती तर लग्नानंतर तिची काय अवस्था केली असेल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओवर लोकं अनेक कमेंट करताना दिसत आहेत. एकानं लिहिलं की जया बच्चन ही चांगली व्यक्ती नाही. तर दुसरा नेटकरी म्हणाला जगातल्या जास्त सासू या जया बच्चनसारख्या असतात. तिसरा नेटकरी म्हणाला, सत्य हे आहे की जया बच्चननं कोणत्या सुंदर व्यक्तीला पाहिलं तर ती तिरस्कार करते, मग ती ऐश्वर्या असो किंवा रेखा. अनेक वर्षांनंतर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओला लाखो लोकांनी पाहिलं आहे. 

हेही वाचा : '9 महिन्यात लोकांना मुलं होतात, तर माझी...'; अर्जुन कपूरच्या 'त्या' व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष

दरम्यान, ऐश्वर्यानं 2007 मध्ये जया बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनशी लग्न केलं. त्या दोघांना एक मुलगी असून आराध्या बच्चन असं तिचं नावं आहे. आराध्या तिची आई ऐश्वर्या सारखीच दिसते. ऐश्वर्या प्रत्येक ठिकाणी आराध्याला सोबत घेऊन जाते. तर ऐश्वर्या नुकतीच कान्स फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये लेकीसोबत दिसली होती. ऐश्वर्याचे या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत.