रतन टाटांनी सांगितलं, का पुन्हा सांभाळली टाटा ग्रुपची जबाबदारी

रतन टाटांनी पुन्हा जबाबदारी सांभाळली

Updated: Oct 25, 2016, 09:21 AM IST
रतन टाटांनी सांगितलं, का पुन्हा सांभाळली टाटा ग्रुपची जबाबदारी title=

मुंबई : सायरस मिस्त्री यांना अचानक टाटा ग्रुपच्या चेअरमन पदावरुन हटवल्यानंतर जबाबदारी सांभाळणाऱ्या रतन टाटा यांनी म्हटलं की, का त्यांनी पुन्हा टाटाची जबाबदारी सांभाळली. कंपनीचे माजी चेअरमन रतन टाटा यांनी कर्मचाऱ्यांना पत्र लिहून कंपनीमध्ये स्थिरता आणि कंपनीवरचा विश्वास वाढवण्यासाठी त्यांनी पुन्हा जबाबदारी स्विकारल्याचं म्हटलं आहे.

पत्रात ७८ वर्षीय रतन टाटा यांनी म्हटलं आहे की, टाटा सन्सच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने सोमवारी एका बैठकीत मिस्त्री यांना तात्काळ चेअरमन पदावरुन हटवलं आहे. त्यांनी म्हटलं की, 'एक नवी व्यवस्थापन प्रणाली तयार केली गेली आहे. टाटा सन्सच्या नव्या चेअरमनच्या निवडीसाठी एक समिती गठन केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

२९ सप्टेंबरला २०१२ ला रतन टाट हे टाटा सन्सच्या चेअरमन पदावरुन सेवानिवृत्त झाले. त्यांनी म्हटलं की, 'समितीला ४ महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. यादरम्यान बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने मला जबाबदारी सांभाळण्यास सांगितली आहे. मी टाटा समूहात स्थिरता राहण्यासाठी आणि त्याप्रती विश्वास कायम राहावी यासाठी पुन्हा जबाबदारी घेतली आहे.

रतन टाटा १९९१ ते २०१२ पर्यंत २१ वर्ष कंपनीचे चेअरमन होते. टाटा ग्रुपमध्ये सगळ्यात मोठी भागीदारी असलेल्या शापूरजी पालोंजी ग्रुपचे प्रतिनिधी म्हणून सायरस मिस्त्रींना नोव्हेंबर २०११ ला टाटा समुहाच्या डेप्युटी चेअरमन केलं गेलं होतं. २००६ मध्ये कंपनीच्या बोर्डवर ते सहभागी झाले. चेअरमन झाल्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले. त्यांना चेअरपदावरुन का हटवण्यात आलं याबाबतचं अधिकृत कारण अजून समोर आलेली नाही. टाटा सन्स त्यांच्या कामाच्या पद्धतीशी सहमत नव्हते. कमी फायदा होणाऱ्या आणि घाट्यात चालणाऱ्या कंपन्यांना बंद करण्याच्या त्यांच्या या निर्णयामुळे अनेक जण सहमत नव्हते.