सोने – चांदी दरात घसरण सुरुच

सोनेचांदीच्या घसरलेल्या मागणीचा पुन्हा एकदा परिणाम सोनेच्या किंमतीवर दिसून आला.दिल्लीच्या बाजारात पुन्हा एकदा सोनेचांदीच्या दरात घसरण दिसून आली.

Updated: Jul 9, 2013, 11:54 AM IST

www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली
सोनेचांदीच्या घसरलेल्या मागणीचा पुन्हा एकदा परिणाम सोनेच्या किंमतीवर दिसून आला.दिल्लीच्या बाजारात पुन्हा एकदा सोनेचांदीच्या दरात घसरण दिसून आली. सोनेचा भाव ७५ रुपयाने घसरून २६५५० प्रति दहा ग्रॅम इतका घसरला. त्याचबरोबर चांदीही २९० च्या दराने घसरुन ४०१४० रुपये किलो इतकी झाली.
सामान्य मार्केटमध्ये सोने ९९.९ आणि ९९.५ च्या शुद्धतेचे सोने अनुक्रमे २६५५० आणि २६३५० रुपये प्रति दहा ग्रॅम या किंमतीवर बंद झाले. तर चांदी २९० रुपयाने घसरुन ४०१४० रुपये किलो या किमतीवर बंद झाली.

पहा प्रमुख शहरातील सोने-चांदीचा दर
मुंबई
सोने २६,२७० (-१५) / चांदी: ४१,२५५ (+११५)
दिल्ली
सोने: Rs २६,६२५ (-९५) / चांदी: ४०,४३० (-१७०)
चेन्नई
सोने: २६,२०५ / चांदी: ३९,९४५
कोलकाता
सोने २६,६४५ / चांदी: ४०,३००
बंगळूर
सोने: २६,५४३ / चांदी: ४०,८००
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.