www.24taas.com, झी मीडिया, जुनागढ
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना १०१ महिलांनी रक्ताने पत्रं लिहून पाठवली आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी हा पत्रप्रपंच करण्यात आला आहे.
जैतपूर-सोमनाथ महामर्गाच्या विरोधात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी मोदींना लिहिलेल्या या रक्तबंबाळ पत्रात शेतकऱ्यांनान्याय मिळवून देण्याचं आवाहन केलं आहे. मोदींना बिहारमधील बांधवांशी चर्चा करायला वेळ आहे, पण गुजरातमधील भगिनींशी नाही. असं या पत्रात म्हटलं आहे. “जैतपूर- सोमनाथ महामार्गावरील जमिनींचं अधिग्रहण करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. मात्र यासाठी आपल्या शेतजमिनी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.” असंही या पत्रात लिहिलं आहे.
विरोध करमणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी जेव्हा या प्रश्नी मोदींची भेट मागितली, मात्र वेळ नसल्यामुळे मोदी त्यांना भेट देऊ शकले नाहीत. इ-मेल्स, एसएमएसद्वारे प्रयत्न करूनही मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधून घेता न आल्यामुळे या महिलांना मोदींना रक्ताने पत्र लिहिलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.