मुंबई : रिझर्व्ह बँकेने आज जाहीर केलेल्या द्विमाही पतधोरणाच्या आढाव्यात रेपो दरात 0.25 टक्क्यांनी कपात केली आहे. रिझर्व्ह रेपो दर आता 7.25 टक्के करण्यात आला आहे.
'आरबीआय' म्हणजे शेअर बाजारासाठी 'चिअरलीडर' नाही, असे आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलंय, गुंतवणुकीला चालना देण्यासाठी दर कपात करण्यात आली असल्याचंही रघुराम राजन यांनी म्हटलंय.
'विकास दर अनुमानापेक्षा कमकुवत आहे.', आकडेवारी काहीही दर्शवित असली तरी विकास दर आणखी वाढणे आवश्यक आहे. विकासदर 7.5 टक्के दराने वाढत असताना व्याजदर कपात करण्याची गरज काय? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले.
काही तरी "विसंगती" असल्याचेही त्यांनी सांगितले. एकीकडे कंपन्यांचे उत्पन्न कमी होत आहे मात्र जीडीपी वाढत आहे हे विसंगत आहे. शिवाय ग्राहकांच्या मागणीत वाढ झाल्याचेही दिसून येत नाही.
'आरबीआय' म्हणजे शेअर बाजारासाठी 'चिअरलीडर' नाही. महागाईच्या काळात रुपयाप्रती विश्वास देणे आणि त्याच्या मुल्यावर लोकांचा विश्वास टिकवून ठेवण्याचे आमचे काम आहे.अनेक निर्यातदार माझ्याकडे येतात आणि निर्णय करण्यासाठी स्थिरता अतिशय मौल्यवान आहे, असे सांगतात. मात्र आमची भूमिका चिअरलीडरची नसल्याचे, त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.