आरबीआयकडून व्याजदरात कोणताही बदल नाही

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन आज वार्षिक पतधोरणाचा तिसरा द्वैमासिक आढवा जाहीर केलाय. पतधोरणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

Updated: Aug 4, 2015, 11:45 AM IST
आरबीआयकडून व्याजदरात कोणताही बदल नाही title=

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन आज वार्षिक पतधोरणाचा तिसरा द्वैमासिक आढवा जाहीर केलाय. पतधोरणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी व्याजाचे दर पुन्हा एकदा कमी करावेत अशी मागणी सरकारच्या वतीनं पुन्हा एकदा करण्यात आली होती. पण सध्याची परिस्थिती बघता व्याजाचे दर जैसे थेच ठेवण्यात आलेय. 

देशात मान्सूनची प्रगती समाधानकारक नसल्यानं खरीपाच्या पिकांवर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळं अन्न धान्याच्या महागाई येत्या काळात वाढ होईल अशी शक्यता आहे. म्हणूनच व्याजाचे दर कमी मागणीला चालना देणं रिझर्व्ह बँकेला तूर्तास तरी परवडणारं नाही. म्हणूनच व्याजाचे दर जैसे थेच ठेवलेत. 

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण ठरवण्याच्या अधिकारांविषयी सध्या देशात जोरदार चर्चा सुरू आहे. गव्हर्नर पदाला असणारं महत्व कमी करण्याचा प्रस्ताव नुकताच सरकारला सादर करण्यात आलाय. सरकारनं याविषयी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.