शालेय शिक्षणात संस्कृत अनिवार्य करण्याची शिफारस

कमीत कमी चार वर्षे तरी  शालेय अभ्यासक्रमात शास्त्रीय भाषा शिकणे सक्तीचे करावे, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका संघटनेने केली आहे.

Updated: Jul 9, 2015, 01:34 PM IST
शालेय शिक्षणात संस्कृत अनिवार्य करण्याची शिफारस title=

नवी दिल्ली : कमीत कमी चार वर्षे तरी  शालेय अभ्यासक्रमात शास्त्रीय भाषा शिकणे सक्तीचे करावे, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका संघटनेने केली आहे.

संस्कृत, तामिळ, अरबी, ग्रीक अशा इतर शास्त्रीय भाषांची आपल्या शालेय शिक्षणात अनिवार्य , यासाठी धोरणात बदल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

इंग्रजी भाषेची आवड नसणाऱ्या मुलांना शास्त्रीय भाषेचा पर्याय खुला असावा, यासाठी खास ही शिफारस करत असल्याचे म्हटले आहे.

शालेय अभ्यासक्रमात सुरुवातीची आठ मातृभाषा हीच प्रथम भाषा असायला हवी, आणि इंग्रजी ही द्वितीय भाषा असली पाहिजे, असे भारतीय शिक्षण मंडळाचे मत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.