विमान प्रवाशांकरिता वाहतूक मंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

विमानाने प्रवास करणाऱ्यांना केंद्रिय वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी एक खुशखबर दिलीये. फ्लाईट रद्द झाल्यास प्रवाशांना १० हजार रूपयांपर्यंत भरपाई देण्याची घोषणा आज अशोक गजपती राजू यांनी केलीये.

Updated: Jun 11, 2016, 01:20 PM IST
विमान प्रवाशांकरिता वाहतूक मंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा  title=

मुंबई : विमानाने प्रवास करणाऱ्यांना केंद्रिय वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी एक खुशखबर दिलीये. फ्लाईट रद्द झाल्यास प्रवाशांना १० हजार रूपयांपर्यंत भरपाई देण्याची घोषणा आज अशोक गजपती राजू यांनी केलीये.

ट्रॅव्हल एजंट किंवा ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून बुकिंग केलं असेल तरीही 15 दिवसांत प्रवाशांना रिफंड देणं विमान कंपन्यांसाठी अनिवार्य आहे. त्याचबरोबर त्यांनी प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी काही घोषणा आज केल्या आहेत.

काय आहेत घोषणा

१. अपंग प्रवाशांच्या सेवांमध्ये सुधारणा
२. तिकीट रद्द करावयाचे असल्यास त्याची फी मुख्य तिकीटाहून जास्त नसावी. त्याचप्रमाणे रिफंडकरिता जास्तीची फी आकारता येणार नाही. रिफंड कॅस की क्रेडिट कार्डने घ्यायचा याचा निर्णय प्रवासी स्वत: घेतील.

३. स्पेशल ऑफर असलेल्या विमानांचे तिकीट रद्द केल्यास देखील रिफंड मिळेल.
४. उड्डाणाच्या 24 तासाहून कमी कालावधीत फ्लाईट रद्द झाल्यास 10 हजार रुपयांपर्यंत भरपाई देण्याची तरतूद

५. ओव्हरबुकींगमुळे प्रवाशांचा प्रवेश नाकारला तर २०,००० पर्यंत भरपाई
६. 15 किलोहून अधिक सामान असल्यास पुढील 5 किलोपर्यंत प्रतिकिलो 100 रुपयांहून जास्त रक्कम आकारता येणार नाही.