www.24taas.com, नवी दिल्ली
अभिनेत्री म्हटलं की त्यांना सेटवर हवी ती गोष्ट झाली नाही तर त्या सरळ पॅकअप म्हणतात. मग निर्मात्याला त्याची मनधरणी करावी लागते. असा काहीसा हट्ट खासदार बनलेल्या अभिनेत्री रेखाने केल्याची घटना नुकतीच घडली.
रेखाला दिल्लीत महाराष्ट्र सदनमध्ये उतरवण्यात आले होते, मात्र त्याऐवजी तिला फाइव्ह स्टार हॉटेल हवे होते. जोपर्यंत अशी सोय होत नाही तोपर्यंत आपण एफडीआयबाबत सरकारकडून मत देणार नाही, अशी हट्टी भूमिका रेखाने घेतली.
दिल्लीत राहण्यासाठी मनपसंद जागा न मिळाल्याने रेखा नाराज आहे. तिला महाराष्ट्र सदनमधील रूमही पसंत नव्हती. त्यामुळे तिने एफडीआयसाठी मत देण्यापूर्वी आपली याबाबतची अट समोर ठेवली होती. ज्यावेळी तिला पंचतारांकित हॉटेलातील निवासाबाबतचे आश्वासन देण्यात आले त्याचवेळी तिने राज्यसभेत जाऊन एफडीआयच्या विषयावर सरकारच्या बाजूने मत दिले.
रेखाबरोबर सचिनचीही राज्यसभेतसाठी निवड झाली होती, मात्र राज्यसभेत मतदानाच्यावेळी सचिन कोलकाता कसोटी खेळत होता त्यामुळे त्याला मतदानाला येता आले नाही.
यापूर्वी सचिनला खासदार म्हणून बंगला देण्यात येणार होता. मात्र, आपण दिल्लीत सदैव राहणार नाही त्यामुळे हा बंगला सचिनने नाकारला होता. परंतु, अभिनेत्री रेखाने अशा प्रकारे हट्टीपणा करून आपले नावलौकिला कुठेतरी काळीमा फासला आहे.