नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेनं बुधवारी संध्याकाळी ११ पेमेंट बँकांचे परवान्यांना तत्वतः मान्यता दिलीय. यामध्ये पोस्ट खातं, रिलायन्स इंडस्ट्रीज, आदित्य बिर्ला नुव्हो, पेटीएम, टेक महिंद्रा, फिनो, एअरटेल कॉमर्स ,व्होडोफोन एम पैसा, अशा देशातल्या बड्या कंपन्यांचा समावेश आहे.
पेमेंट बँकेला कर्ज देण्याचा अधिकार नाही. पण देशातल्या मोबाईल नेटवर्कच्या आधारे घरघरात बँकेच्या सुविधा पोहचवण्यासाठी या बँकांचा मोठा हातभार लागणार आहे. येत्या काळात परवाना धारक कंपन्या त्यांच्या बिझनेस कॉरस्पॉडंट्सच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचतील.
ग्राहकांना या बँकांमध्ये पैसे साठवून नंतर त्यातून आपले सर्व व्यवहार करता येतील. इंटरनेट बँकिंगचा वापर करणाऱ्या शहरी ग्राहकांसाठी ही सुविधा नवी नाही. पण जिथे बँकांच्या शाखा पोहचलेल्या नाहीत, पण मोबाईल नेटवर्क आहे, अशा ठिकाणी नागरिकांना बँकांच्या सगळ्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.