धर्म, जात, पंथ यावर कोणताही भेदभाव मान्य नाही : मोदी

अल्पसंख्याकांच्या अधिकाराबाबत काल्पनिक शंकाकुशंकांना स्थान नाही, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय. टाइम मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध मुद्यांवर आपली रोखठोक मतं मांडली.

PTI | Updated: May 8, 2015, 10:17 AM IST
धर्म, जात, पंथ यावर कोणताही भेदभाव मान्य नाही : मोदी title=

नवी दिल्ली : अल्पसंख्याकांच्या अधिकाराबाबत काल्पनिक शंकाकुशंकांना स्थान नाही, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय. टाइम मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध मुद्यांवर आपली रोखठोक मतं मांडली.

धर्म, जात, पंथ या आधारावरील कोणताही भेदभाव मान्य नसल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय. भारत हा लोकशाहीप्रधान देश असून हुकूमशहाची गरज नाही, असंही त्यांनी सांगितलंय. 

याशिवाय अमेरिका आणि चीनसोबतच्या संबंधांवर मोदींनी आपली मतं मांडलीत. गेल्या तीन दशकांपासून भारत चीन सीमेवर असलेल्या शांततेचा मोदींनी उल्लेख केला. याशिवाय निर्भया डॉक्युमेंट्रीवरील बंदीबाबत मोदींनी पहिल्यांदाच या मुलाखतीमध्ये वक्तव्य केलं.

पीडितेचा सन्मान कायम ठेवण्याची सरकारची जबाबदारी असल्याचं मोदी यावेळी म्हणालेत. या मुद्यावर बोलताना पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रूही तरळले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.