नवी दिल्ली: रेल्वे भरती परीक्षेसाठीची अॅडमिट कार्ड रेल्वे प्रशासनानं जारी केली आहेत. २०१५-१६ या वर्षासाठी १८,२५२ जागांसाठी परीक्षा होणार आहेत. त्यासाठी ही अॅडमिट कार्ड जारी करण्यात आली आहेत.
रेल्वे भरती परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता, ते आपलं अॅडमिट कार्ड रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करु शकतात.
रेल्वेमधल्या भरतीसाठी इच्छुकांकडून रेल्वेनं फॉर्म भरून घेतले होते. २५ जानेवारी २०१६ ही हा फॉर्म भरायची शेवटची तारीख होती.
मुंबई, अहमदाबाद, अजमेर, अलाहाबाद, बेंगलोर, भोपाल, भुवनेश्वर, बिलासपूर, चंदीगड, चेन्नई, गोरखपूर, गुवाहाटी, जम्मू-श्रीनगर, कोलकाता, मालदा, मुजफ्फरपूर, पाटणा, रांची, सिकंदराबाद, सिलीगुरी आणि तिरुअनंतपुरम या भागांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
असिसट्ंट स्टेशन मास्टर, कमर्शियल अप्रेंटिस, ट्रॅफिक अप्रेंटिस, चौकशी-रिजर्व्हेशनसाठी क्लर्क, गुड्स गार्ड, जुनियर अकाऊंट्स असिसटंट आणि टायपिस्ट या पदांसाठी ही परीक्षा होणार आहे.
रेल्वे भरतीसाठीची ही परीक्षा मार्च ते मे २०१६ दरम्यान होईल अशी माहिती मिळत आहे. तसंच ही परीक्षा कॉम्प्यूटरवर होणार असल्याचंही समजतंय.