'स्मृती इराणी म्हणजे लेडी अमिताभ'

रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण आणि जेएनयू वादावर संसदेमध्ये उत्तर देणाऱ्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणींच्या भाषणाची सोशल नेटवर्किंगवर जोरदार चर्चा सुरु आहे.

Updated: Feb 25, 2016, 11:40 AM IST
'स्मृती इराणी म्हणजे लेडी अमिताभ' title=

मुंबई: रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण आणि जेएनयू वादावर संसदेमध्ये उत्तर देणाऱ्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणींच्या भाषणाची सोशल नेटवर्किंगवर जोरदार चर्चा सुरु आहे. 

बॉलीवूड अभिनेते ऋषि कपूर यांच्यावरही स्मृती इराणींच्या भाषणाची भुरळ पडली आहे. स्मृती इराणींनी एक हाती विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्या लेडी अमिताभ बच्चन आहेत, असं ट्विट ऋषि कपूर यांनी केलं आहे. 

तर अभिनेते आणि भाजप खासदार परेश रावल यांनीही ट्विटरवरून या भाषणाचं कौतूक केलं आहे. स्मृती इराणी नावाची त्सुनामी आली, यामध्ये सगळे विरोधक वाहून गेले, असं परेश रावल म्हणाले आहेत.