मदर तेरेसा यांना संतपद

आपले आयुष्य गोरगरिबांच्या सेवेसाठी वेचणाऱ्या मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्यात येणार आहे. याबाबत निर्णयावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले.

Updated: Mar 15, 2016, 10:45 PM IST
मदर तेरेसा यांना संतपद title=

नवी दिल्ली  : आपले आयुष्य गोरगरिबांच्या सेवेसाठी वेचणाऱ्या मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्यात येणार आहे. याबाबत निर्णयावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले.

पोप फ्रान्सिस यांनी आज यासंदर्भातील निर्णय जाहीर केला. ४ सप्टेंबरला मदर तेरेसा यांना संतपदाची पदवी देण्यात येईल. रोमन कॅथलिक चर्चच्या कार्डिनल्सकडून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

तेरेसा यांनी आपल्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटीज’ या संस्थेमार्फत गरीब, अनाथ आणि गरजूंची निरलसपणे सेवा केली. या कार्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. पोप जॉन पॉल (द्वितीय) यांच्या काळात २००३ मध्ये तेरेसा यांना संतपदाने सन्मानित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.