जींद : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दावा केला आहे की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा येत्या ६ महिन्यांत तुरूंगात असतील. आपल्या सरकारच्या काळात काँग्रेसने हरियाणामध्ये केलेल्या घोटाळ्यांचा पर्दाफाश केला जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
विविध वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी हरियाणातील जींदमध्ये एका महाविद्यालयाच्या समारंभात केलेल्या भाषणामध्ये त्यांनी काँग्रेस आणि रॉबर्ट वद्रांवर टीका केली.
लुटलेला पैसा त्यांच्याकडून वसुल करून तो पुन्हा राज्यातील विकासकामांमध्ये वापरला जाईल, ज्या लोकांनी राज्यातील जनतेचा पैसा लुटला आहे. त्यांना कोणत्याही स्थितीत माफ केले जाणार नाही, असे आश्वासन खट्टर यांनी दिले
यावेळी मनोहर लाल खट्टर म्हणाले, हरियाणातील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी नेमलेली ढिंगारा समिती ६ महिन्यांत आपला अहवाल सादर करेल. समितीच्या अहवालात ज्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्या सर्वांना तुरुंगात टाकण्यात येईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.