रायपूर : परीक्षेत कॉपी करण्याच्या प्रकरणात वादात आलेलले छत्तीसगडचे शिक्षण मंत्री केदारनाथ कश्यप यांच्या पत्नी शांती कश्यप, या नापास झाल्या आहेत, शांती कश्यम एमए इंग्रजीच्या परीक्षेत नापास झाल्या आहेत.
मंत्र्यांच्या पत्नीचं मार्कशीट देखील सोशल मीडियावर व्हायरल झालं, मात्र पंडित सुंदरलाल शर्मा ओपन युनिवर्सिटीने हे मार्कशीट जारी न केल्याचं म्हटलं आहे. आता हे प्रकरण विद्यापिठाच्या समितीकडे सोपवण्यात आलं आहे.
विद्यापिठाने शिक्षण मंत्र्यांच्या पत्नीचा निकाल थांबवला असला, तरी मार्कशीट सोशल मीडियात आलंय, आणि त्यात मिसेस सीएम नापास झाल्या आहेत.
या मार्कशीटनुसार ज्या विषयात कॉपी करण्यात आली, त्या इंग्रजी भाषेतील प्रॅक्टिकलच्या परीक्षेत शांती कश्यप यांनी ३० पैकी २१ मार्कस आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.