सोनियांच्या जावयाचीही होणार आता झाडाझडती!

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा जावई रॉबर्ट वढेरा यांना आता विमानतळांवर झाडाझडतीला सामोरं जावं लागणार आहे. कारण, त्यांना देण्यात आलेला हा विशेषाधिकार काढून घेतला जातोय. 

Updated: Sep 10, 2014, 02:01 PM IST
सोनियांच्या जावयाचीही होणार आता झाडाझडती! title=

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा जावई रॉबर्ट वढेरा यांना आता विमानतळांवर झाडाझडतीला सामोरं जावं लागणार आहे. कारण, त्यांना देण्यात आलेला हा विशेषाधिकार काढून घेतला जातोय. 

रॉबर्ट वढेरा यांना मिळालेल्या या 'स्पेशल' सवलतींवर बरीच टीका झालीय. 'इकोनॉमिक टाईम्स' या आर्थिक वर्तमानपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, हवाई उड्डाणमंत्री अशोक गणपति राजू यांनी 'ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन' (BCAS) च्या अधिकाऱ्यांसोबत सोमवारी एक बैठक घेतली. यामध्ये, विमानतळांवर झाडाझडतीपासून सूट मिळणाऱ्या लोकांची यादी छोटी करण्याबद्दल यावेळी निर्देश देण्यात आलेत. 

केवळ सन्मान देण्यासाठी नाही तर या सूचीत केवळ आवश्यक त्याच व्यक्तींची नावं असायला हवीत, असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं. याबाबत, गृहमंत्रालय एक पुनर्समीक्षाही करेल. त्यानंतरच, वढेरा यांचं नाव हटविण्यात येईल. 

विमानतळांवर सुरक्षा चौकशीतून ज्या लोकांना सूट मिळालीय त्यामध्ये 30 महत्त्वपूर्ण पदावरील व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये भारताचे राष्ट्रपतींसहीत एसपीजी सुरक्षा मिळालेल्या व्यक्तींचा समावेश आहे. याशिवाय या यादीत दोन व्यक्तींच्या नावाचा समावेश आहे... त्यापैंकी एक आहेत दलाई लामा आणि दुसरे आहेत रॉबर्ट वढेरा.... 

यापूर्वी, प्रियांका गांधी यांनी 'एसपीजी'च्या अध्यक्षांना पत्र लिहून आपली, आपल्या पतीची तसंच मुलांची सुरक्षा काढून घेण्याविषयी स्वत: पत्र लिहिलं होतं. पण, ही सुरक्षा काढून घेण्यास नकार देण्यात आला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.