मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक करत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा काल मध्यरात्रीपासून बंद केल्यानंतर आता आपल्या नोटा कशा बदलायच्या असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही जाणून घेणे गरजेचे आहे.
१) ५०० ते १००० रुपयांचे जुन्या नोटा, १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत तुमच्या बँकेत आणि पोस्टातील कोणत्याही खात्यात जमा करू शकतात.
२) तुमच्याकडे पैसे जमा करण्यासाठी ५० दिवस आहे. त्यामुळे तुम्हांला नोटा जमा करण्यासाठी गोंधळ करण्याची आणि धावपळ करण्याची गरज नाही.
३) तुमचा पैसा तुमच्याकडेच राहणार आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.
४) ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा कितीही काढून तुमच्या खात्यात टाकू शकतात आणि तसेच आवश्यकतेनुसार रक्कम काढू शकतात.
५) सुरूवातीला खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा दिवसाला १०००० रुपये आणि आठवड्यात वीस हजार काढू शकणार आहे. असे नव्या नोटांच्या उपलब्धतेला लक्षात घेऊन करण्यात आले आहे. याची मर्यादा आगामी काळात वाढविण्यात येईल.
६) तात्काळ वापरासाठी तुम्ही तुमच्याकडील ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा १० नोव्हेंबर आणि ३० नोव्हेंबर पर्यंत कोणत्याही बँक आणि पोस्ट ऑफीसमध्ये आपले ओळखपत्र दाखवून बदलू शकतात.
७) ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, पासपोर्ट, पॅनकार्ड, दाखवून नोट बदलू शकतो.
८) सुरूवातील १० नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर पर्यंत चार हजार रुपयांच्या जुन्या ५०० आणि हजार रुपयंच्या नोटात बदलता येणार आहे. त्यानंतर १५ दिवसांनंतर चार हजारांची मर्यादा वाढविण्यात येणार आहे.
९) असे काही लोक असतील त्यांनी ३० डिसेंबरपर्यंत आपल्या जुन्या नोटा बदलल्या नाहीत त्यांना आणखी एक चान्स देण्यात येणार आहे.
१०) ज्यांनी ३० डिसेंबरपर्यंत नोटा बदलल्या नाहीत त्यांनी रिझर्व बँकेच्या ठराविक ऑफीसमध्ये आपल्या घोषणापत्रासह ३१ मार्च २०१७ पर्यंत जमा करावी लागणार आहे.
११) ९ आणि १० नोव्हेंबर रोजी एटीएम सेंटर बंद राहणार आहे. तसेच एटीएममध्ये दररोज फक्त २ हजार रुपये काढता येणार आहे.
१२) काही दिवसांनंतर मग एटीएममधून ४ हजार रुपये काढता येणार आहेत..
१३) ८ नोव्हेंबर १२ वाजेपासून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटात सरकारसाठी बंद करण्यात आल्या. पण पुढील ७२ तास त्या नोटात सामन्य व्यवहारात राहणार आहेत.
१४) ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत सरकारी हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, मेट्रो स्थानक, गॅस एजन्सी, मेडिकलमध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जातात
१५) ज्यांच्या घरात नागरिक आजारी आहेत त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.
१६) सरकारी हॉस्पिटलमध्ये मेडिकल दुकाने आगेत त्या ठिकाणी डॉक्टरच्या प्रिसक्रिप्शनने जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार आहे.
१७) ११ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत रेल्वे तिकीट बुकींग सेंटर, एअरलाइन्स बुकींक सेंटरवर जुन्या ५०० आणि एक हजाराच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहे. या काळात यात्रा करणाऱ्यांची सुविधा व्हावी असा याचा उद्देश आहे.
१८) केंद्र सरकारच्या को ऑपरेटीव्ह वस्तूंच्या दुकानांवर केंद्रीय भंडार, सफल आणि दुग्ध विक्री केंद्रावर ११ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत जुन्या ५०० आणि एक हजाराच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहे.
१९) सार्वजनिक क्षेत्राचे पेट्रोल पंप, CNG पंपावर ११ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत जुन्या ५०० आणि एक हजाराच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहे.
२०) स्मशानभूमीतही ११ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत जुन्या ५०० आणि एक हजाराच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहे.
२१) आंतरराष्ट्रीय पर्यटनाहून परत येणाऱ्या नागरिकांच्या जवळ असलेल्या ५०० आणि एक हजाराच्या नोटा ५००० हजारांपर्यंत स्वीकारल्या जाणार आहे.
२२) आंतरराष्ट्रीय पर्यटकांना ५००० रुपयांच्या नोटा बदलून देण्यात येतील.
२३) याशिवाय नॉन कॅश देणे घेण्याची प्रक्रिया, चेक पेमेंट, डिमांड ड्राफ्ट, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड पेमेंट किंवा इ ट्रान्सफरमध्ये कोणतीच अडचण येणार नाही.