अतिरेक्यांनी तरूंगात खोदले भुयार

अहमदाबाद येथील साबरमती जेलमध्ये अतिरेक्यांनी भुयार खोदलेय. साबरमती जेलमध्ये अतिरेक्यांनी खोदलेले भुयार १८ फूट लांबीचे आहे. इंडियन मुजाहिद्दीनच्या सात अतिरेक्यांनी हे भुयार खोदल्याचे स्पष्ट करण्यात आलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 11, 2013, 03:40 PM IST

www.24taas.com, अहमदाबाद
अहमदाबाद येथील साबरमती जेलमध्ये अतिरेक्यांनी भुयार खोदलेय. साबरमती जेलमध्ये अतिरेक्यांनी खोदलेले भुयार १८ फूट लांबीचे आहे. इंडियन मुजाहिद्दीनच्या सात अतिरेक्यांनी हे भुयार खोदल्याचे स्पष्ट करण्यात आलेय.
साबरमती कारागृहात अटकेत असलेल्या सात अतिरेक्यांनीच भुयार खणल्याचे कारागृह प्रशासनाला सापडल्याने खळबळ उडाली आहे. दहशतवाद्यांनी बोगदा खोदण्यासाठी काठीचा वापर केला. जेणेकरून आवाज येऊ नये, याची खबरदारी अतिरेक्यांनी घेतली होती.

अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी स्फोटातील १४ आरोपी सध्या साबरमती कारागृहात आहेत. त्यांच्या बराकीजवळ हे भुयार सापडले आहे. हे सर्वजण इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत.
बोगदा अर्ध्यापर्यंत खणण्यात आल्यानंतर कारागृह प्रशासनाला याबाबत माहिती मिळाली. तुरूंगअधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे खोदाई करताना अतिरेकी पकडले गेलेत.