विलुपुरम, तामिळनाडू : उन्हाची तीव्रता वाढली की लिंबाचा दरही वाढतो. थंडगार पाणी पिण्याबरोबर लिंबू सरबतला जास्त पसंती दिली जाते. सध्या लिंबाचे दर वाढताना दिसतात. मात्र, या लिंबाची खरेदी पाहून तुमचा विश्वास बसणार नाही. चक्क एका लिंबाला ३९,००० रुपयांना एका दाम्पत्याने खरेदी केलेय.
सध्या बाजारात २ रुपयांपासून २ रुपयेपर्यंत एक लिंबू विक्री होत आहे. मात्र, उन्हाळ्यात हेच लिंबू भाव खाते, चक्क ५ ते ते ७ रुपयापर्यंत दर मिळतो. मात्र, या लिंबाला एवढी मोठी किंमत कशी मिळते? असा तुमचा प्रश्न असेल तर वेलुपुरम जिल्ह्यामधील बालातंडेउतपनी मंदिरात ११ दिवसांचा उत्सव असतो. या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी मुरुगन या देवाच्या भाल्याला लटकविण्यात आलेल्या लिंबाचा लिलाव करण्याची परंपरा आहे. मंदिर संस्थान याचा लिलाव आयोजित करतात.
दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सवाच्या शेवटच्या दिवशी मंदिर प्रशासनाने पवित्र लिंबाचा लिलाव केला. यावर्षी लिलाव करण्यात आलेल्या एका लिंबाला चक्क ३९,००० रुपयांची बोली लागली. हा पवित्र लिंबू खरेदी करण्यासाठी नागरिक बोली लावण्यास सुरुवात करतात. यावर्षी जयरामन आणि अमरावथी या दाम्पत्याने ३९ हजार रुपयांची बोली लावत हे पवित्र लिंबू खरेदी केले.
दरम्यान, येथील लोकांची देवावर मोठी श्रद्धा आहे. या श्रद्धेपोटी, लिलाव करण्यात आलेली वस्तू ज्यांच्याकडे जाते त्यांना सुख, समृद्धी प्राप्त होते आणि खरेदी करणाऱ्या त्या कुटुंबाची चांगली भरभराट होते. त्यामुळे मुरुगन या देवाच्या भाल्याला लटकविण्यात आलेल्या लिंबाचा लिलाव करण्याची परंपरा आहे.