मुंबई : हसीना पारकरचा रविवारी मुंबईमध्ये झालेल्या मृत्यूमुळं सर्वात दुःखी असेल तर तिचा भाऊ दाऊद इब्राहिम... जरी अंडरवर्ल्ड गॅंगवॉर कोणत्याही कारणानं सुरु झालं असलं तरी त्यामागचं हसीनाच्या विधवा होण्याचं कारण खूप मोठं आहे. दाऊद या घटनेला कधी विसरु शकला नाहीय. हसीना ही इब्राहिम पारकारची पत्नी होती, २६ जुलै १९९२ला नागपाडामध्ये अरुण गवळीच्या ४ शूटर्सनं त्याची हत्या केली होती.
पापा गवळीच्या मृत्यूचा सूड
असं मानले जातंय की, इब्राहिम पारकरची हत्या हा अरुण गवळीचा भाऊ पापा गवळीच्या हत्येचं उत्तर होतं. मात्र दाऊदनं आपल्या मेहूणा इब्राहिमची हत्या ही आपल्या व्यक्तिगत लढाई सहभागी केली आणि इब्राहिमच्या हत्येमागं असलेले सगळे शूटर्स ज्यात शैलेश हळदणकर, विपिन शेरे, राजू बटाला आणि संतोष पाटील हे प्रमुख होते. त्यांना उघडपणे मारण्याचा निर्णय घेतला. मात्र त्या दाऊदचे दुर्देव की ते शूटर्स एक महिन्यापर्यत सापडलेच नाही.
याच दरम्यान दाऊदच्या मेहुण्याला मारण्याच्या आनंदात शूटर्स एकावर एक हत्या करायला लागले. त्यानंतर ३१ ऑगस्ट १९९२ला रात्री कुंभारवाड्यात मुकेश रावत नावाच्या व्यक्तिला गोळ्या मारल्या होत्या. योगायोगानं या शूटर्संना पळताना काही लोकांनी पाहिलं होतं. या घटनेनंतर दोन दिवसांनी पुन्हा ते शूटर्स कुंभारवाड्यात दिसले. त्यावेळी लोकांनी त्यांना ओळखलं आणि त्यातल्या दोघांना, शैलेश हळदणकर आणि विपिन शेरे यांना पकडून त्यांना मारण्यास सुरु केलं.
जे.जे. रुग्णालयात झाली होती हत्या
गंभीर जखमी झालेले शूटर्स शैलेश हळदणकर आणि विपिन शेरे या दोघांना ही पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. जसं दोघांना रुग्णालयात दाखल केलं तसंच तिथं दाऊदनं दोघांनाही मारण्याचा निर्णय केला आणि याच कारणानं दुबईमध्ये बसून कारस्थान रचायला सुरु केलं. या कारस्थानाला परिणाम देण्यासाठी त्यानं काही लोकांना कामाला लावलं. त्यात उल्हासनगर मधील एक राजकारणी नेता ही होता, पण मुख्य म्हणजे या हत्येचा कट सुभाष सिंग ठाकूर आणि सुनील सावंत ऊर्फ सावत्या या २ लोकांवर सोपवला.
नेपाळ मध्ये झाली मैत्री
सुभाष सिंग ठाकूर सावत्याची मैत्री ही काठमांडूला झाली होती. सावत्याला दाऊदनं पहिलेच काठमांडूमध्ये घर दिलं होतं. दाऊदच्या आदेशावरुन सुभाष सिंग ठाकूर यानं गवळीच्या साथीदार पॉल पॅट्रिकला मारलं होतं. दाऊदच्या सांगण्यावरुन सावत्यानं सुभाषला काठमांडूच्या घरी लपण्यासाठी जागा दिली होती. योगायोग असा की याच दरम्यान छोटा राजननी दाऊदच्या जवळ असलेला पार्षद किम बहादुर थापाची हत्या केली होती, असं म्हटलं जातं की, सुभाष सिंगनं दाऊदच्या सांगण्यानुसार या हत्येचा बदला घेण्याचा ठरवलं आणि त्यानंतर काठमांडूवरुन येऊन संजय रागड, दिवाकर चुरी आणि अमर जुकर या राजनच्या एक एक साथीदारांची हत्या केली होती.
या हत्येला उत्तर देण्यासाठी सुभाष सिंगनं पुन्हा उत्तरप्रदेशातील अशा डॉनची मदत घेतली, त्यानं ३ महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक लढली होती. सुभाष सिंगनंतर दिल्लीला या डॉनच्या घरी लपला होता.
याचवेळी आपल्या मेहुण्याचे हत्येकरी शैलेश आणि विपिन जे. जे. रुग्णालयात दाखल झाल्याची खबर दाऊदला मिळाली तेव्हा ही गोष्ट त्यानं सावत्याला सांगितली. सावत्यानं दिल्लीला सुभाष सिंगशी संपर्क केला. याच्यानंतर सुभाष सिंग ठाकूर उत्तरप्रदेशातील डॉनसोबत दिल्लीहून मुंबईला आला आणि सावत्याला भेटला. सावत्यानं (सुभाष सिंगनं पोलिसांना सांगितलं होतं) त्याला आणि उत्तरप्रदेशच्या डॉनला सांगितलं होतं की, त्यानं जे.जे मध्ये पूर्ण सेटींग केली आहे आणि त्यासोबत आणखी काही शूटर्सही तयार ठेवलं आहेत.
त्यानंतर पूर्ण तयारीत रात्री तीनच्या सुमारास काही शूटर्स दोन फियाट कारमधून जे.जे रुग्णालयात पोहचले. त्याचवेळी अहमद मन्सूरी आणि सावत्या नावाचे शूटर बाईकने तिथे आले.
एके ४७ नी झाली फायरिंग
शैलेश हळदणकर आणि विपिन शैरेच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांना सुभाष आणि त्याचे साथीदार पोलीस वाटले होते. पण जेव्हा खऱ्या पोलिसांना सुभाषच्या मागे उभे असणारे लोकांच्या हातात एके ४७ पाहिली, तेव्हा त्यानी लगेच वॉर्ड नंबर १८चा गेटचा दरवाजा आतल्या बाजूने बंद केला. तिथेच दोन्ही शूटर्स होते. त्यानंतर यूपीच्या डॉन दरवाजा ठोकवला, पण कोणी दरवाजा नाही उघडला. मात्र त्या कोणी दरवाजा उघडल नाहीत म्हणून सुभाष आणि सावत्याला संशय आला की, रुग्णालयात सेटिंग केली आहे. त्यामुळे त्यांनी डॉनला रुग्णालयातून लगेच निघण्यास सांगितले. पण तो निघून न जाता दरवाज्यावर गोळ्या चालवण्यास सुरु केले. त्याचवेळी रुग्णालायचा दुसऱ्या बाजूनेही गोळीबार सुरु झाला. काही वेळापर्यत रुग्णालयाच्या दोन्ही बाजूने गोळीबार सुरुच होता. त्यामुळे शैलेश हळदणकर आणि २ पोलीस मारले गेले, सहा जण जखमी झाले. त्या सहा जणांमध्ये एक व्यक्ती असा होता तो शूटर प्रधान. त्या शूटरला भिवंडीच्या महापौरांच्या गाडीत बसवून उपचारासाठी नालासोपारा मधल्या एका डॉक्टरकडे नेले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.