SBIदेत आहे महिन्याला १५ ते २० हजार रूपये कमवण्याची संधी
Updated: Apr 24, 2015, 09:47 AM IST
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडिया महिन्याला १५ ते २० रुपये कमवण्याची संधी देत आहे. ही कमाई करण्यासाठी तुम्हाला बॅंकेत नोकरी करण्याचीही गरज नाही. त्यासाठी तुमच्याकडे फक्त १० फूट लांब आणि १० फूट रूंद जागा हवी.
तुमच्याकडे मोक्याच्या ठिकाणी म्हणजे बाजारपेठेत अथवा वर्दळीच्या ठिकाणी जागा असणे आवश्यक आहे. जेथे एटीएम सेंटर सुरू करता येऊ शकतं. त्याद्वारे तुम्ही दरमहिना १५ ते २० हजार रूपये कमवू शकता.
एसबीआयची यावर्षी देशभरात ८००० एटीएम सुरू करण्याची योजना आहे. अशात जर तुमच्याकडे त्यांच्या गरजेची पुर्तता करणारी जागा असेल तर तुम्ही ती एसबीआयला देऊ शकता.
तुम्हाला जर एटीएमला जागा देण्यासाठी अर्ज करण्यास इच्छूक असाल तर, एटीएमच्या लोकेशनची माहिती तुमच्या नजीकच्या एसबीआय शाखेत जाऊन घेऊ शकता. त्यानंतर तुमच्या जवळील जागेची माहिती बॅंकेला देऊन तुम्ही तुमच्या जागेत एटीएम सुरू करून पैसे कमविण्याची संधी आहे.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.
x
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking
this link