मतभेदांनंतर याकूब मेमनची याचिका सरन्यायाधीशांकडे

फाशीला स्थिगिती देण्याच्या याकूब मेमनच्या याचिकेवर आता पुन्हा एकदा नव्यानं सुनवाणी होणार आहे. आजच्या सुनावणीत न्यायमूर्ती दवे आणि कुरियन यांच्यात मतभेद झालेत. त्यामुळे सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार आहेत. 

PTI | Updated: Jul 28, 2015, 02:14 PM IST
मतभेदांनंतर याकूब मेमनची याचिका सरन्यायाधीशांकडे title=

नवी दिल्ली : फाशीला स्थिगिती देण्याच्या याकूब मेमनच्या याचिकेवर आता पुन्हा एकदा नव्यानं सुनवाणी होणार आहे. आजच्या सुनावणीत न्यायमूर्ती दवे आणि कुरियन यांच्यात मतभेद झालेत. त्यामुळे सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार आहेत. 

मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमन याच्या याचिकेवरील सुनावणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने अधिक न्यायमूर्तींचा समावेश असणाऱ्या वरिष्ठ पीठाकडे वर्ग करण्याची शिफारस केली. सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार आहेत. याचिकेवरील सुनावणीवेळी दोन न्यायमूर्तींमध्ये एकमत न झाल्याने सुनावणी वरिष्ठ पीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला

दवे यांनी याकूबची याचिका फेटाळली तर कुरियन यांनी याकूबच्या कुयरिटीव्ह पिटिशन संदर्भात घातलेल्या घोळावर आधी निर्णय़ घेण्याचा आग्रह धरला. त्यामुळं आता ही याचिका कोणत्या खंडपीठाकडे वर्ग करायची याचा निर्णय मुख्य न्यायाधीश एच एल दत्तू हे निर्णय घेणार आहेत. तसंच हे खंडपीठ याकूच्या याचिकेवर उद्या सुनावणी करणार आहे. त्यामुळं याकूबच्या फाशीवर उद्याच फैसला होणार आहे. 

याकूबला ३० जुलैला फाशी देण्याचा निर्णय यापूर्वी सुप्रीम कोर्टानं दिलाय. त्यानुसार याकूबच्या फाशीची नागपूर जेलमध्ये तयारी सुरू आहे. मात्र उद्याच्या खंडपीठाच्या सुनावणीनंतर फाशीबाबत शिक्कामोर्तब होणार.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.