भुजबळांची एसआयटी चौकशी होणारच; सुप्रीम कोर्टाचा दणका

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना सुप्रीम कोर्टाचा जोरदार झटका बसलाय. मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवत भुजबळ यांच्या 'एसआयटी' चौकशीला परवानगी दिलीय. 

Updated: Feb 2, 2015, 03:33 PM IST
भुजबळांची एसआयटी चौकशी होणारच; सुप्रीम कोर्टाचा दणका title=

नवी दिल्ली : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना सुप्रीम कोर्टाचा जोरदार झटका बसलाय. मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवत भुजबळ यांच्या 'एसआयटी' चौकशीला परवानगी दिलीय. 

भुजबळ यांच्यासह त्यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि पुतळे समीर भुजबळ यांचीही एसआयटी चौकशी होणार आहे. छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाले होते.

'आप'च्या नेत्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी चौकशी करण्यासाठी मागणी करत हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टानं एसआयटीची स्थापना करण्याचं सूचवत चौकशीचे आदेश दिले होते. या निर्णयाला भुजबळांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. 

मात्र, सुप्रीम कोर्टानं भुजबळांची याचिका फेटाळून लावल्यानं आता भुजबळांच्या एसआयटी चौकशीचा मार्ग मोकळा झाला असून भुजबळांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भुजबळांच्या एसआयटी चौकशीची मागणी करणाऱ्या आणि सुप्रीम कोर्टातील याचिकाकर्त्या आपच्या नेत्या अंजली दमानिया यादेखील आज कोर्टात उपस्थित होत्या.

काय आहेत भुजबळांवरचे आरोप... 

* सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना गैरव्यहार केल्याचा आरोप 

* ११ प्रकल्पांत गैरव्यवहार करून ८२ कोटी रू. कमावले 

* इंडिया बुल्स,डीबी रियाल्टीत संशयास्पद आर्थिक व्यवहार 

* मुंबई विद्यापीठातील ग्रंथालयाचे कंत्राट इंडिया बुल्सला 

* कंत्राटाच्या बदल्यात भुजबळ चॅरिटेबल ट्रस्टला अडीच कोटी 

* एमआयजी कॉलनी रिडेव्हलपमेंटचे कंत्राट आकृती, काकडे बिल्डरला

* आकृती, काकडेंकडूनही भुजबळ चॅरिटेबल ट्रस्टला पैसे

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.