कोलकात्यात रेडअलर्ट: दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता

कोलकात्यात दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिल्यामुळं रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामुळं कोलकाता बंदर भागात सुरक्षा व्यवस्था अधिक प्रमाणात वाढविण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर जनतेला नौदलाच्या दोन युद्धनौका पाहण्यासाठी तीन दिवस बंदी घालण्यात आली असून गोदी भागातही लोकांना जाण्यापासून रोखलं जात आहे.

PTI | Updated: Nov 5, 2014, 09:05 AM IST
कोलकात्यात रेडअलर्ट: दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता title=

कोलकाता: कोलकात्यात दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिल्यामुळं रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामुळं कोलकाता बंदर भागात सुरक्षा व्यवस्था अधिक प्रमाणात वाढविण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर जनतेला नौदलाच्या दोन युद्धनौका पाहण्यासाठी तीन दिवस बंदी घालण्यात आली असून गोदी भागातही लोकांना जाण्यापासून रोखलं जात आहे.

केंद्रीय गुप्तचर विभागानं कोलकात्यामध्ये हा संभाव्य दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तविली असून विशेषकरून बंदर भागात त्यासाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती कोलकाता पोलिसांनी दिली. शहरभर त्यामुळं मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे, अशी माहिती नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर एका वरिष्ठ पोलीस अधिकार्या नं दिली. 

या संभाव्य दहशतवादी हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांकडून छोट्या बोटी वापरण्याची शक्यताही आहे. या पार्श्वेभूमीवर नौदलाने आपल्या खुकरी आणि सुमित्रा या दोन नौका कार्यात्मक कारणासाठी परत बोलाविल्या आहेत. मात्र या संभाव्य हल्ल्याच्या इशार्याममुळं त्या परत बोलाविल्या आहेत का, असं विचारलं असता संरक्षण विभागाच्या एका अधिकार्यालनं त्यास नकार दिला. तो म्हणाला, त्या केवळ कामासाठी परत बोलाविल्या आहेत. ७ नोव्हेंबरपर्यंत त्या इथं लोकांना पाहाण्यासाठी खुल्या ठेवण्यात येणार होत्या. इस्टर्न नेव्हल कमांडनं दिलेल्या आदेशानुसार त्या पुन्हा सागरातील अज्ञात कारणासाठी पुन्हा सागरात रवाना करण्यात आल्या आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.