नवी दिल्ली : सेल्फीची क्रेझ युवकांवर एवढी भारी झालीय की त्यासाठी ते आपला जीवाची बाजी लावायलाही मागे-पुढे पाहत नाहीत... जगभरातली ही क्रेझ भारतातही मृत्यूच्या रुपाने दाखल झालीय. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका घटनेत एका माजी काँग्रेस आमदाराच्या नातवानं सेल्फीच्या नादात स्वत:वर गोळी झाडून घेतलीय.
आपल्या डोक्यावर रिव्हॉल्व्हर लावून राहुल यादव सेल्फी काढत असताना हा अपघात घडलाय.
सेल्फी काढत असताना राहुलच्याच हातून रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर दाबला गेला आणि गोळी राहुलचं डोकं भेदून बाहेर पडली... या घटनेत राहुलचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर राहुलला लगेचच हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
राहुलला इंदौरच्या एका सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अॅडमिशन घ्यायचं होतं. इंदौरला जाण्यापूर्वी तो भोपाळच्या सीआय कॉलनीत आपल्या एका जवळच्या नातेवाईकांकडे थांबला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.