मध्यप्रदेशच्या जेलमधून सिमीचे ७ कार्यकर्ते फरार!

मध्य प्रदेशच्या खांडवा जेलमधून ७ कैदी फरार झालेत. हे सातही कैदी सिमीचे कार्यकर्ते आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 1, 2013, 11:51 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, खंडवा, म.प्र.
मध्य प्रदेशच्या खांडवा जेलमधून ७ कैदी फरार झालेत. हे सातही कैदी सिमीचे कार्यकर्ते आहेत.
कैद्यांनी बाथरुमची भिंत फोडली आणि ते फरार झाले. फरार होत असताना त्यांनी दोन सुरक्षारक्षकांवर चाकूनं हल्ला केला. जखमी झालेल्या या दोन्ही रक्षकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
दरम्यान, पळून जाऊन एका घरात लपून बसलेल्या एका कैद्याला लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. खंडवा परिसरात पोलिसांनी हाय अर्लट जाहीर केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.