गोव्यात 'सेक्‍स टुरिझम' वाढवलं जातंय : केजरीवाल

'आम आदमी पार्टी'चे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी  गोव्यात सेक्स टुरिझम वाढवण्याचा आरोप केला आहे. केजरीवाल म्हणाले,  'गोव्यामध्ये 'सेक्‍स टुरिझम'चे प्रमाण वाढत असून येथील राजकीय पक्षांचा त्याला पाठिंबा आहे'.

Updated: Jun 29, 2016, 04:33 PM IST
गोव्यात 'सेक्‍स टुरिझम' वाढवलं जातंय : केजरीवाल

पणजी : 'आम आदमी पार्टी'चे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी  गोव्यात सेक्स टुरिझम वाढवण्याचा आरोप केला आहे. केजरीवाल म्हणाले,  'गोव्यामध्ये 'सेक्‍स टुरिझम'चे प्रमाण वाढत असून येथील राजकीय पक्षांचा त्याला पाठिंबा आहे'.

केजरीवाल यापुढे बोलताना म्हणाले, 'राजकीय पक्षांच्या पाठिंब्यावर गोव्यात सुरू असलेला अंमली पदार्थांचा व्यवसाय आणि वेश्‍याव्यवसाय यामुळे राज्याची बदनामी होत आहे.' 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. प्रचारासाठी केजरीवाल यांनी येथील हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटन व्यवसायाशी संबंधितांची आज भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

 'वेश्‍याव्यवसाय, अंमली पदार्थांचा विळखा आणि 'सेक्‍स टुरिझम'मुळे गोव्याचे नाव खराब होत आहे. राजकीय पक्षांचाच त्याला पाठिंबा असल्याने हे प्रकार रोखले जात नाहीत', असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.