मध्यावधी निवडणुकांची तयारी ठेवा - शरद पवार

‘मध्यावधी निवडणुकांची तयारी ठेवा’ असे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना निर्देश देतानाच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी `एकपक्षीय सत्तेचे दिवस गेले’ म्हणत काँग्रेसलाही गर्भित इशारा दिलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 10, 2012, 01:18 PM IST

www.24taas.com, बडोदा
‘मध्यावधी निवडणुकांची तयारी ठेवा’ असे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना निर्देश देतानाच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी `एकपक्षीय सत्तेचे दिवस गेले’ म्हणत काँग्रेसलाही गर्भित इशारा दिलाय. या बैठकीला अजित पवार मात्र गैरहजर राहिले... यावर ताप आल्यानं गैरहजर राहिल्याचं स्पष्टीकरण पवारांनी दिलंय.

बडोद्यात सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकांची तयारी ठेवण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना दिले आहेत. एकपक्षीय सत्तेचे दिवस आता गेलेत.... सध्या आघाडी सरकारचेच दिवस आहेत. त्यामुळं आघाडीतल्या सर्व पक्षांना सोबत घेऊन निर्णय घेणं गरजेचं असल्याचंही सांगत त्यांनी काँग्रेसलाही गर्भित इशारा दिला.
‘राष्ट्रिवादी काँग्रेसनं गुजरातमध्येच विधानसभा निवडणूक लढविण्या चा निर्धार केलाय त्यासाठी काँग्रेससोबतच आघाडी करावी, असा प्रस्तारव पक्षातर्फे मांडण्यात आलाय. इतर राज्यांमध्येही राष्ट्रवादीला विस्ताराची संधी आहे त्यामुळेच गुजरातसोबतच हिमाचल प्रदेशमध्येडही निवडणूक लढविण्यााचा प्रस्ताीव मांडण्यात आलाय. जिथे शक्यय असेल, ताकद असेल तिथे निवडणूक लढविण्याात येईल... काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. केंद्रात आणि महाराष्ट्रा त आमची आघाडी आहे. त्याथमुळे गुजरातमध्येलही आघाडी करण्याोचा प्रस्ता.व आहे. पण, ही आघाडी सन्मािनजनक हवी... हिमाचल प्रदेशमध्येल स्थाानिक पक्षांसोबत आघाडी करण्या्त येईल’ असं पवार यांनी म्हटलंय.
देशात कधीही मध्यावधी निवडणुका होतील असे संकेत मायावतींनी काल दिले होते. त्यानंतर आज शरद पवार यांनी त्यांचीच री ओढलीय. या पार्श्वभूमीवर देशात मध्यावधी निवडणुकांचे वारे वाहू लागल्याचं चित्र उभं राहतंय.