नवी दिल्ली: 'आप'च्या माजी नेत्या शाजिया इल्मी भाजपाकडून केजरीवाल यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहण्याचा विचार करतायेत. विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाजिया उद्या भाजपमध्ये येणार असल्याचं कळतंय.
दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून दिल्लीत खऱ्या अर्थानं रणधुमाळी पाहायला मिळत आहे. दरम्यान, शाजिया इल्मी यांना भाजपाच्या तिकीटावर केजरीवाल यांच्याविरूध्द उभे करण्यात येणार आहे की नाही हे अद्याप भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलं नाही.
अरविंद केजरीवाल यांच्यावर घणाघाती आरोप करून शाजिया इल्मी यांनी गेल्यावर्षी आम आदमी पार्टीचा राजीनामा दिला होता. शाजिया इल्मी यांनी नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग घेतला होता.
शाजिया यांनी आम आदमी पक्षाकडून २०१३ साली झालेली दिल्ली विधानसभा निवडणूक होती परंतू त्यांना भाजपाच्या अनील शर्मा यांच्याकडून अवघ्या ३२६ मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. लोकसभा निवडणुकीत गाझियाबादमधून उभ्या राहिलेल्या शाजिया इल्मी यांना भाजपाचे उमेदवार माजी सैन्यप्रमूख व्ही.के. सिंग यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.