नवी दिल्ली : एनडीए सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला, नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली, मात्र या शिवसेनेने केंद्रीय मंत्रिमंडळात समावेशास नकार दिला आहे. मात्र सुरेश प्रभु यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावरून सुरेश प्रभु यांच्या हकालपट्टीची मागणी वाढतेय. सुरेश प्रभु हे शिवसेनेचे उपनेते आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोन घेण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकार दिला असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे आता अनंत गिते हे देखिल आपल्या केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचं सांगण्यात येतंय. एनडीएतून अखेर शिवसेना बाहेर पडणार असल्याचंही सुत्रांनी म्हटलंय.
शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार अनिल देसाई हे देखिल शपथविधीसाठी दिल्लीत पोहोचले होते, मात्र दिल्ली एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर ते परतले आहेत, त्यांना परतण्याचे आदेश शिवसेनेने दिले असल्याचं सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.