मुंबई : नरेंद्र मोदी सरकारचा आज दुपारी मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आहे. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई दिल्लीकडे रवाना झाल्याने, त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेशाची शक्यता वाढल्याने, शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यास भाजपला सोप झालं असल्याचं बोललं जातंय.
नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज दुपारी दीड वाजता दिल्लीत पार पडणार आहे. शिवसेना आणि भाजपची राज्यात सत्ता सहभागावरून एकीकडे चर्चा सुरू असतांना, मोदी सरकारने नियोजित वेळेवर मंत्र्यांचा शपथविधी घेतला आहे.
शिवसेनेचे खासदार अनिल देसाई हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अनिल देसाई यांना केंद्राकडून मंत्रिपद मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
अनिल देसाई यांचा मोदी मंत्रिमंडळात समावेश होत असेल, तर भाजपला राज्यातील सत्तेत शिवसेनेला सहभागी करून घेण्यास आणखी सोप जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.