नवी दिल्ली : शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड प्रकरणावरुन संसदेत शिवसेनेनं जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी सेना खासदारांनी 'एअर इंडिया'विरोधात घोषणा दिल्या. दरम्यान, एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चप्पल मारहाण प्रकरणानंतर खासदार गायकवाड 12 दिवसांनंतर दिल्लीत दाखल झालेत.
या प्रकरणी शिवसेनेनं लोकसभा अध्यक्षांकडे स्थगन प्रस्ताव दाखल केला गेलाय. गायकवाड यांच्या विमान प्रवासबंदीवर चर्चा करण्याची मागणी यावेळी शिवसेनेनं केलीय.
लोकसभेचं कामकाज न करता प्राधान्यानं हा मुद्दा चर्चेला घ्यावा, अशी मागणी शिवसेनेनं लोकसभा अध्यक्षांकडे केली.