नोकरीच्या पहिल्याच दिवशी रेप, शोरूमच्या मालकाला अटक

ऑप्टिकल शोरूममध्ये सेल्सगर्लची नोकरी लागल्यावर पहिल्या दिवशी ड्यूटीवर अनर्थ घडला. पहिल्या दिवशी तिने रेप झाल्याची तक्रार दाखल केली.  दुकानाच्या ६१ वर्षीय मालकाला अटक करण्यात आली आहे. महिला घटस्फोटीत असून ती लिव-इन रिलेशनशीपमध्ये राहत आहे. तर आरोपी मालक पहिल्या पत्नीच्या निधनानंतर दुसऱ्या पत्नीसह राहत आहे. 

PTI | Updated: Jul 3, 2014, 09:49 PM IST
नोकरीच्या पहिल्याच दिवशी रेप, शोरूमच्या मालकाला अटक title=

नवी दिल्ली  : ऑप्टिकल शोरूममध्ये सेल्सगर्लची नोकरी लागल्यावर पहिल्या दिवशी ड्यूटीवर अनर्थ घडला. पहिल्या दिवशी तिने रेप झाल्याची तक्रार दाखल केली.  दुकानाच्या ६१ वर्षीय मालकाला अटक करण्यात आली आहे. महिला घटस्फोटीत असून ती लिव-इन रिलेशनशीपमध्ये राहत आहे. तर आरोपी मालक पहिल्या पत्नीच्या निधनानंतर दुसऱ्या पत्नीसह राहत आहे. 

ही घटना पश्चिम दिल्लीच्या पश्चिम विहारमध्ये घडली. येथील एका ऑप्टिकल शोरूमचे मालक नवीन मल्होत्राने ( नाव बदललं आहे)  सेल्सगर्ल म्हणून नोकरीसाठी वर्तमानपत्रात जाहिरात दिली. अनेक तरुणी आणि महिलांनी इंटव्ह्यू दिला. ३० जून रोजी मंगोलपुरीजवळील बुद्ध विहार येथे राहणारी सपना (नाव बदललं आहे) देखील इंटरव्ह्यूला आली. तिला सिलेक्ट करण्यात आले. त्यानंतर एक जुलैपासून ड्युटीला येण्यासाठी तिला सांगण्यात आले. 

मंगळवारी सकाळी १०.३० वाजता ती ड्युटीला आली. शोरूमचे शटर बंद होते. तिने नवीन मल्होत्राला फोन केला. त्याने सांगितले की, मागील रस्त्याने वर ऑफिसमध्ये येऊन जा. सपना वर ऑफिसमध्ये गेली. त्या ठिकाणी ऑफिस आणि गोदाम आहे. नवीन मल्होत्रा एका दुसऱ्या महिला कर्मचारी सोबत होता. त्याने सपनाला बसायला सांगितले. ती त्या ठिकाणी बसल्यावर नवीनने तिला हात लावायला सुरूवात केली. दुसरी महिला कर्मचारी उठून बाहेर गेली. सपनाने पाणी मागितले, पाण्याने अर्धी भरलेली बाटली होती. पाणी प्यायल्यावर सपनाला शुद्ध राहिली नाही. काही वेळाने तिला शुद्द आल्यावर तिचे कपडे अस्ताव्यस्त होते. मल्होत्रा आपले कपडे व्यवस्थित करीत होते. 

सपनाने खाली उतरून आपल्या लिव्ह इन पार्टनरला फोन केला. कोर्टात व्यस्त असल्याने त्याने फोन उचलला नाही. तेव्हा तिने आपल्या नातेवाईकांना फोन लावला. घटनेनंतर नातेवाईकांनी तिला १०० क्रमांकावर फोन लावण्याचा सल्ला दिला. त्यावेळी पोलिस घटना स्थळी आले. महिलेची मेडिकल चाचणी केली. 

मालकावर गुंगीचे औषध पाजल्याचा आरोप लावण्यात आला. त्यावर एफआयआर दाखल करण्यात आली. बुधवारी कोर्टात जबानी दिल्यानंतर मल्होत्राला अटक करण्यात आले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.