www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
कर्नाटकातील मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेली रस्सीखेच आज सायंकाळी संपली. काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी के. सिद्धरामय्या यांच्या नावावर सहमती झाली आहे.
मुख्यमंत्री निवडीबाबत शुक्रवारी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. या पदासाठी सिद्धरामय्या आणि वरिष्ठ नेता मल्लिकार्जुन खडगे यांच्यात चुरस होती.
यूपीएतील वरिष्ठ मंत्री ए. के. एंथोनी, राज्याचे प्रभारी मधुसूधन मिस्त्री, कर्नाटक स्क्रिनिंग समितीचे अध्यक्ष लुईजिन्हो फलेरो आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी काँग्रेस पर्यवेक्षकांची भूमिका निभावली.
यावेळी बैठकीत कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर चर्चा झाली आणि सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले. यावेळी ८५ पेक्षा जास्त आमदारांनी सिद्धरामय्या यांच्या नावाला पसंती दिली.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.