बातमी तुमच्या कामाची : कर वाचवण्याचे हे सात सर्वोत्तम पर्याय

मुंबई : आपला कर वाचवणं कोणाला आवडत नाही?

Updated: Feb 23, 2016, 01:13 PM IST
बातमी तुमच्या कामाची : कर वाचवण्याचे हे सात सर्वोत्तम पर्याय  title=

मुंबई : आपला कर वाचवणं कोणाला आवडत नाही? कर भरण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येक जण काही ना काही मार्ग शोधतो ज्यामुळे त्याला कमीत कमा कर भरावा लागेल. पण, कर वाचवण्यासाठी हा एक पर्याय असू शकतो... त्याशिवाय इतरही काही पर्याय उपलब्ध आहेत... 

सेवाभावी संस्थेला दान

आयकर विभागाने दानधर्म करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्थांना पात्र असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. अशा संस्थांना देणगी दिल्यास कर भरण्यात सूट मिळू शकते.

आश्रित व्यक्तीच्या देखभालीसाठी खर्च  

तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा खर्च उचलूनही तुम्ही कर वाचवू शकता. पण, त्यासाठी ती व्यक्ती पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असली पाहिजे.

आश्रित व्यक्तीच्या खास आजारासाठी इलाज

तुम्ही दत्तक घेतलेल्या एखाद्या व्यक्तीच्या खास आजाराचा संपूर्ण खर्च तुम्ही उचलणार असाल तर त्यासाठी तुम्ही कोणत्याही विमा कंपनीकडून पैसा मिळवलेला नसावा. याशिवाय कॅन्सर आणि न्यूरॉलॉजिलक आजारांसाठीही ही सूट मिळू शकते.

 

गृह कर्जावर व्याज
तुम्ही जर कर्ज काढून घेतलेल्या घरात राहात असाल तरच तुम्हाला याचा फायदा मिळू शकतो. हे घर तुम्ही समजा भाड्याने दिले असेल तर वर्षांचे पूर्ण व्याज कर बचतीच्या स्वरुपात वसूल केले जाऊ शकते.

NPS/NSC मध्ये गुंतवणूक
नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) अथवा पोस्टाच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC)मध्ये गुंतवणूक करुन तुम्ही ८० सी, ८० सीसीसी आणि ८० सीसीडी या कलमांनुसार १.५ लाख पर्यंतच्या उत्पन्नावर करात सूट मिळवू शकता.

घर भाडे भरुन
जर तुमच्या पगारात तुम्हाला हाऊस रेंट अलाऊंस (HRA)मिळत नसेल तरीही तुम्ही करात सूट मिळवू शकता.

बँकेत फिक्स डिपॉझिट (५ वर्षांसाठी)
तुम्ही बँकेत फिक्स डिपॉझिट भरतच असाल...  हेच फिक्स डिपॉझिट तुम्ही पाच वर्षांसाठी ठेवले तर तुम्हाला कलम ८० सी नुसार करात सवलत मिळू शकते... शिवाय बँकेकडून व्याजही मिळणार...