कानपूर : आयआयटी कानपूरच्या इमेजिंग फॉर रेल नेवीगेशन सिस्टम म्हणजेच सिमरनच्या तंत्रज्ञानाने रेल्वेची सूचना तंत्रज्ञान मजबूत होणार आहे. 2014 आणि 2015 च्या रेल्वे बजेटमध्ये या तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच 129 कोटी रूपयांची बजेटमध्ये तरतूद करून ट्रेनच्या आतील आणि बाहेरील माहिती तंत्रज्ञानाला हायटेक सिस्टमने जोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. केंद्र सरकारच्या या पावलामुळे आयआयटी कानपूरचे शास्त्रज्ञ फारच उत्साही आहेत.
राजधानी शताब्दी एक्स्प्रेस सह 36 ट्रेन्सचं यापूर्वी सफल परीक्षण करण्यात आलं आहे, हे सर्व रिझल्टस चांगले आले आहेत. आता या तंत्रज्ञानाला बजेटमध्ये आणल्यानंतर रेल्वेला हायटेक बनवण्याची सुरूवात केली जाणार आहे.
या प्रोजेक्टचे कोऑर्डिनेटर प्रो. संजय गोविंद धांडे यांनी हे तंत्रज्ञान बहुपयोगी असल्याचं सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.