'स्मृती इराणी प्रियांका गांधींपेक्षा सुंदर'

 प्रियांका गांधींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत माफी मागण्याऐवजी भाजप नेते विनय कटियार यांनी आगीत तेल ओतायचं काम केलं आहे.

Updated: Jan 25, 2017, 08:17 PM IST
'स्मृती इराणी प्रियांका गांधींपेक्षा सुंदर' title=

नवी दिल्ली : प्रियांका गांधींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत माफी मागण्याऐवजी भाजप नेते विनय कटियार यांनी आगीत तेल ओतायचं काम केलं आहे. आमच्या स्मृती इराणी या प्रियांका गांधींपेक्षा सुंदर आहेत, अशी मुक्ताफळं कटियार यांनी उधळली आहेत.

स्मृती इराणींचा चेहरा सुंदर आहे. अमेठी लोकसभा मतदार संघातून लढताना त्यांनी राहुल गांधींच्या नाकी नऊ आणले होते. माझ्या विचारसरणीबाबत शंका उपस्थित करण्यापेक्षा स्वत:ची विचारसरणी तपासा असंही कटियार म्हणाले आहेत.

प्रियांका गांधींहून जास्त सुंदर चेहरे भाजपमध्येही स्टार प्रचारक म्हणून आहेत. अनेक हिरोईन्स भाजपमध्ये आहेत. अनेक हिरोईन आणि मॉडल्स राजकीय पक्षांचा प्रचार करतात, असं वादग्रस्त वक्तव्य विनय कटियार यांनी केलं होतं.

काँग्रेसला वाटतं की, प्रचारासाठी त्यांच्याकडे प्रियांका गांधींचा सुंदर चेहरा आहे, ज्याचा वापर प्रचारासाठी केला जाऊ शकतो. पण, सुंदरता आणि क्षमता यांची गल्लत करण्याची चूक काँग्रेस करत आहे, असं कटियार म्हणाले होते.