OMG! भाजप ऑफिसमध्ये पाण्याच्या बाटलीत निघालं सापाचं पिल्लू

छत्तीसगढची राजधानी रायपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पाण्याच्या बाटलीत सापाचं पिल्लू सापडल्यानं खळबळ माजली. ही पूर्ण बॉटल सील बंद होती. मग यात सापाचं पिल्लू कसं आलं याची चौकशी करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत. 

Updated: Sep 10, 2015, 09:49 AM IST
OMG! भाजप ऑफिसमध्ये पाण्याच्या बाटलीत निघालं सापाचं पिल्लू title=

रायपूर: छत्तीसगढची राजधानी रायपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पाण्याच्या बाटलीत सापाचं पिल्लू सापडल्यानं खळबळ माजली. ही पूर्ण बॉटल सील बंद होती. मग यात सापाचं पिल्लू कसं आलं याची चौकशी करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत. 

आणखी वाचा -  VIDEO : सापानं भररस्त्यात केली आत्महत्या...

पाणी बॉटल पुरवणारी कंपनी ही रायपूरची स्थानिक कंपनी आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका बैठकीदरम्यान मुख्यमंत्री रमन सिंह यांच्या मेडिकल स्टाफमधील डॉक्टप पूनम अग्रवाल यांनी पाणी पिण्यासाठी बॉटल उचलली तर त्यांना पाहून धक्का बसला. त्यांनी पाहिलं बाटलीच्या तळाशी सापाचं मेलेलं पिल्लू आहे. 

ही माहिती इतरांना कळताच सर्वांनी आपआपल्या पाण्याच्या बाटल्या फेकून दिल्या. कंपनीला चौकशीचे आदेश सरकारनं दिले. पाण्याची बॉटलही तपासासाठी पाठवण्यात आलीय. 'अमन' नावाची खाजगी कंपनीनं बनवलेली ही पाणी बॉटल आहे. 

आणखी वाचा -  लाच मागितली म्हणून तहसील कार्यालयात सोडले साप

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.