पोत्यातून आला बाहेर अजगर, पोलीस चौकीत तारांबळ

हरियाणाच्या फरिदाबाद येथे एका पोलीस चौकीत एक दीड फुटांचा अजगर एका पोत्यातून बाहेर आला आणि आज प्रचंड धावपळ उडाली. पोलीस कर्मचाऱ्यांनी या अजगराला एका नाल्याजवळून पकडले होते.

Updated: Nov 14, 2014, 04:09 PM IST
पोत्यातून आला बाहेर अजगर, पोलीस चौकीत तारांबळ title=

फरिदाबाद : हरियाणाच्या फरिदाबाद येथे एका पोलीस चौकीत एक दीड फुटांचा अजगर एका पोत्यातून बाहेर आला आणि आज प्रचंड धावपळ उडाली. पोलीस कर्मचाऱ्यांनी या अजगराला एका नाल्याजवळून पकडले होते.

पोलिस प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सेक्टर- ८ पोलीस चौकीचे कर्मचाऱ्यांनी आज सेक्टर-३ जवळ असलेल्या नाल्याजवळून एक दीड फुटांचा अजगर पकडला आणि त्याला पोत्यात टाकून पोलीस चौकीत घेऊन गेले. त्यानंत पोलीस आपल्या कामाला लागले. 

त्यांनी सांगितले की, काही वेळानंतर जेव्हा पोलिसांनी पोत्याकडे पाहिले तेव्हा पोते फाटले होते. आणि अजगर त्यातून बाहेर आला होता. अजगर पाहून पोलीस चौकीत धावपळ सुरू झाली. खूप मेहनतीनंतर त्याला पुन्हा पकडले आणि पोत्यात भरले आणि वन विभागाकडे सुपूर्द केले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.