सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात अमित शहांना क्लीन चीट

भाजप अध्यक्ष अमित शाह यांना मोठा दिलासा मिळालाय. सोहराबुद्दीन आणि तुलसी प्रजापती एन्काऊंटर प्रकरणात सीबीआयच्या विशेष कोर्टानं अमित शाह यांना क्लीन चिट दिलीय.

Updated: Dec 30, 2014, 08:07 PM IST
सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात अमित शहांना क्लीन चीट title=

नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह यांना मोठा दिलासा मिळालाय. सोहराबुद्दीन आणि तुलसी प्रजापती एन्काऊंटर प्रकरणात सीबीआयच्या विशेष कोर्टानं अमित शाह यांना क्लीन चिट दिलीय.

या दोन्ही एन्काऊंटर प्रकरणातून नाव वगळण्यासाठी अमित शाह यांनी कोर्टात अर्ज केला होता. हा अर्ज सीबीआयच्या विशेष कोर्टानं मंजूर केलाय. सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात आपल्याला राजकीय आकसापोटी गुंतवलेलं असल्याचा दावा शाह यांनी केला होता. 

सोहराबुद्दीन आणि तुलसी प्रजापती यांच्या चकमक प्रकरणात षडयंत्र रचणाऱ्यांमध्ये अमित शहांचाही समावेश असल्याचं सांगत, सीबीआयनं अमित शहांच्या याचिकेला विरोध केला होता. 

हे प्रकरण मुंबईत स्थलांतरीत केल्यानंतर वर्ष उलटलं तरीही स्पेशल सीबीआय कोर्ट वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी करण्यातच व्यस्त आहे. या प्रकरणाची अजूनही कोर्टात ट्रायल सुरू झालेली नाही. 

मात्र सीबीआय कोर्टाच्या या निर्णयाला सोहराबुद्दीनचे कुटुंबीय हायकोर्टात आव्हान देणार आहेत. त्यामुळं शाह यांच्या भवितव्याचा फैसला हायकोर्टात होणार आहे.

बनावट चकमकीच्या दोन प्रकरणांत सीबीआयनं 37 जणांवर चार्जशीट दाखल करण्यात आलीय. यामध्ये तत्कालीन गुजरातचे गृहमंत्री शाह यांच्या नावाचाही समावेश आहे. या प्रकरणातील जवळपास सर्वच आरोपींना मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय.  

गुजरात एटीएसनं नोव्हेंबर 2005 मध्ये गांधीनगरच्या सोहराबुद्दीन आणि त्याची पत्नी कौसर बी यांच्या कथित स्वरुपात चकमकीत ठार केलं होतं.  
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.