Paparazzi Distasteful Comment On Sara Ali Khan: सध्या बॉलिवूडमध्ये कलाकार विरुद्ध पापाराझी असा सुप्त संघर्ष सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. असं असतानाच सोशल मीडियावर एका जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री सारा अली खानसंदर्भात एका फोटोग्राफरने वादग्रस्त विधान केल्याचं ऐकू येत आहे. अभिनेत्रीने फोटो न काढण्याची विनंती केल्यानंतर या फोटोग्राफरने वादग्रस्त विधान केल्याचं व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला असून अभिनेत्रीसंदर्भात असं विधान फोटोग्राफर कसं करु शकतात असा सवाल उपस्थित केला आहे.
हा व्हिडीओ याच वर्षाच्या मार्च महिन्यातील असल्याचं समजतं. या व्हिडीओमध्ये सारा अली खान पांढरा टॉप आणि काळ्या रंगाची पॅण्ट अशा जीमवेअर लूकमध्ये आपल्या गाडीमधून खाली उतरताना दिसत आहे. मात्र ती गाडीमधून खाली उतरल्यानंतर तिला समोर पापाराझी दिसतात. सारा फोटोग्राफर्सला फोटो न काढण्याची विनंती करते. साराला अवघडल्यासारखं झाल्याने तीने फोटो न काढण्याची विनंती केली.
सारा अली खानने फोटोग्राफर्सला कॅमेरा बंद करण्याची निवंती केली. साराने केलेली विनंती ऐकून एका फोटोग्राफरने सारासंदर्भात वादग्रस्त विधान केलं. 'नका (क्लिक) करु? मग कशासाठी हिरोईन झालीस?' (नही करे? काहे की लिये बनी फिर हिरोईन) असं हा फोटोग्राफर म्हणाल्याचं ऐकून येत आहे. फोटोग्राफरचं हे विधान ऐकून अनेकांनी संताप व्यक्त केला असून कोणत्याही महिलेशी बोलण्याची ही योग्य पद्धत नसल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. सेलिब्रिटी आहेत म्हणून त्यांचे वाटेल तसे फोटो काढण्याचा हक्क फोटोग्राफर्सला नाही असा टोलाही अनेकांनी फोटोग्राफर्सला लगावला आहे.
Apparently, being a celebrity means being devoid of your personal space.
byu/UnacceptableBrat inBollyBlindsNGossip
"ते सेलिब्रिटी आहेत म्हणून त्यांनी कायम फोटोग्राफर्सच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत असं काही बंधनकारक नाही. अनेकदा अशाप्रकारे अपमानकारक प्रतिक्रिया फोटोग्राफर्स देत असल्याचं पाहायला मिळालं आहे," असं एकाने म्हटलं आहे. "तुम्ही असा सगळीकडे कॅमेरा घेऊन फिरता कामा नये. लोकांच्या अगदी तोंडावर कॅमेरा पकडून फोटोंची मागणी करणं योग्य नाही. ते सेलिब्रिटी आहेत तर त्यांनी असे फोटो देणं बंधनकारक नाही, याची जाण ठेवली पाहिजे," असं अन्य एकाने म्हटलं आहे.
मात्र दुसरीकडे एका गटाने साराच्या पीआर टीमनेच या फोटोग्राफर्सला ती जीमला जात असल्याची माहिती दिली असल्याने ते तिथे गोळा झाले असावेत असा अंदाजही व्यक्त केला आहे. सारानेच फोटोग्राफर्सबरोबर असं वागायला नको होतं असं काहींचं म्हणणं आहे.
यापूर्वीही अनेक अभिनेत्रींनी फोटोग्राफर्सकडून चुकीच्या पद्धतीने फोटो काढण्यावरुन आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. अभिनेत्री जान्हवी कपूरने फोटोग्राफर्सला कॅमेरासमोर, 'चुकीच्या अँगलने माझे फोटो काढू नका' असं बजावलं आहे. अनेकदा आपण फोटोग्राफर्सला जीमच्या टाइट कपड्यांमध्ये माझे फोटो काढू नका असं सांगूनही ते ऐकत नाहीत, अशी तक्रार जान्हवीने केलेली.
अभिनेत्री मृणाल ठाकूरनेही एका कार्यक्रमामध्ये पापाराझींना पाठमोरा फोटो देण्यास नकार दिला होता. अभिनेत्री पलक तिवारी, नायरा बॅनर्जी आणि इतरांनीही अशाप्रकारे त्यांचे मागून फोटो काढण्यावर उघडपणे आक्षेप घेतला आहे.
MAW
(20 ov) 139/7
|
VS |
BRN
140/1(15.1 ov)
|
Bahrain beat Malawi by 9 wickets | ||
Full Scorecard → |
QAT
(20 ov) 189/4
|
VS |
SDA
193/6(19.2 ov)
|
Saudi Arabia beat Qatar by 4 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 113/7
|
VS |
RWA
114/4(16.5 ov)
|
Rwanda beat Malawi by 6 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.