टीव्ही सीरियल अभिनेत्रीची छेडछाड... मोबाईल हिसकावला

शहारात एका बदमाशानं एका टीव्ही सीरियलमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीची कथित रुपात छेडछाड काढल्याची घटना घडलीय. इतकंच नाही तर तिचा मोबाईल हिसकावून घेण्यापर्यंत या गुंडाची मजल गेलीय. संबंधित अभिनेत्रीनं याची तक्रार पोलिसांत नोंदवलीय.

Updated: Dec 30, 2014, 05:04 PM IST
टीव्ही सीरियल अभिनेत्रीची छेडछाड... मोबाईल हिसकावला title=

कोलकाता : शहारात एका बदमाशानं एका टीव्ही सीरियलमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीची कथित रुपात छेडछाड काढल्याची घटना घडलीय. इतकंच नाही तर तिचा मोबाईल हिसकावून घेण्यापर्यंत या गुंडाची मजल गेलीय. संबंधित अभिनेत्रीनं याची तक्रार पोलिसांत नोंदवलीय.

सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडलीय. पोलिसांमध्ये नोंदवल्या गेलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी रात्री जेव्हा 34 वर्षीय अभिनेत्री नेताजी नगर स्थित आपल्या घराच्या बाहेर एक छोट्या गल्लीतून जात होती तेव्हा एका तरुणानं तिचा पाठलाग केला... तिच्याजवळ पोहचत त्यानं तिच्याशी छेडछाड केली. पोलिसांनी यासंबंधी छेडछाड आणि झटापटीची तक्रार नोंदवून घेतलीय. 

कोलकाता पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या घटनेची चौकशी सुरु केलीय आणि आरोपीचा शोध सुरू आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.